Skip to main content

“दुरावा – नात्यांतील अंतराची भावकथा”

 ❇️ दुरावा

➖➖➖➖➖➖➖➖➖


“दुरावा या विषयावर आधारित मराठी भावनिक कथा, नात्यातील अंतर आणि मनातील वेदना दर्शवणारी कथा”



स्नेहा ऑफिसमधून परतली आणि सोफ्यावर विसावली. डोअर बेल वाजली म्हणून तिने दरवाजा उघडला. तर बाहेर तिचे वडील उभे होते. 

"पप्पा! आज लवकर?"

"हो. कारणच तस आहे."

"म्हणजे?"

"तो टीव्ही लाव आधी."

"कशाला?"

"तुझा नवरा हिरो झालाय आज." पप्पा थोड्या उत्साहाने म्हणाले.

"म्हणजे! मला समजल नाही."

"थांब. मीच टीव्ही लावतो." अस बोलून त्यांनी रिमोट हातात घेतला आणि चॅनल बदलायला सुरुवात केली.

"हां. बघ आता."

स्नेहाने पाहिलं. टीव्हीवर न्यूज येत होती.

स्कूल टीचर बीकम्स हिरो आणि अनिरुद्धचा फोटो तिला दिसला. त्याला जखमी अवस्थेमध्ये स्ट्रेचरवरून घेऊन जात होते. त्यानंतर एक व्हिडिओ दाखवला. त्यात अनिरुद्ध एका जळत्या बसकडे धावत जाताना दिसत होता. मागे शाळेला आग लागलेली दिसत होती. लोक ओरडत होते. अनिरुद्ध धावत जळत्या बसमध्ये गेला आणि थोड्या वेळाने एका मुलीला खांद्यावर घेऊन परतला. आणि..आणि काही क्षणातच त्या बसमध्ये स्फोट झाला आणि ती पूर्णपणे खाक झाली.

      स्नेहा डोळे विस्फारून सर्व पाहत होती. तिला सगळंच फार धक्कादायक वाटत होत. 

"अरे बापरे! केव्हा झालं हे?आणि हा काय मूर्ख आहे का! फायर ब्रिगेड ची माणसं होती तिथे. याला सवयच आहे पूर्वीपासून अशा वेळी पुढे जायची. कुठे आहे हा आता?"

"तस काही काळजीच कारण नाही. जास्त काही इन्जुरी नाही.जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेल आहे त्याला. यू शुड बी प्राउड ऑफ हीम."

"प्राऊड! मेला असता तो पप्पा. कसली फिकिरच नसते या माणसाला. कोणी मागे नाही का याच्या?" स्नेहाच्या डोळ्यात पाणी आल. तिने हाताने चेहरा झाकून घेतला.

तिचे पप्पा जवळ आले. तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.

"मला समजतंय बेटा. पण त्याने जे केलं ते चांगल्यासाठीच केलं ना. एका मुलीचे प्राण वाचवले."

"हो पप्पा पण." एवढं बोलून तिने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ते तिला थोपटत राहिले.

अनिरुद्ध कलाकार माणूस होता. स्नेहा आणि तो एकाच आर्ट कॉलेजचे विद्यार्थी होते. त्याच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावावर स्नेहा भाळली होती. स्नेहाचे वडील आर्किटेक्ट होते. त्यांचा या संबंधाला विरोध होता. पण त्याला न जुमानता दोघांनी लग्न केलं. कॉलेजनंतर अनिरुद्ध वेगळे वेगळे जॉब करत राहिला. सोडत राहिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला त्याला आवडायचं. सध्या तो आर्ट टीचर म्हणून एका शाळेत काम करत होता.

    माणसाचं वय जस वाढत जातं तसे त्याचे विचार बदलत जातात. जगण्याच्या प्रायोरीटीज बदलतात. काही गोष्टी सुटतात. काही गोष्टींचं महत्त्व कळायला लागत. तसच काहीस स्नेहा आणि अनिरुद्ध यांच्या संसाराच झालं. अनिरुद्ध केव्हाच प्रॉपर्टी, पैसा याबाबत गंभीर नव्हता. पण भविष्याच्या दृष्टीने आपण काहीतरी विचार करायला पाहिजे हे स्नेहाच मत होत. आता आभाच्या येण्याने त्यांच्या संसाराचा सुंदर त्रिकोण झाला होता. तिने स्वतःची इंटिरिअर डेकोरेशनची एजन्सी सुरू केली होती. अनिरुद्धने पण तिच्याबरोबर काम करावं अशी तिची इच्छा होती. पण अनिरुद्ध काही याला तयार होत नव्हता. स्नेहाने बऱ्याच वेळा त्याला समजवायचा प्रयत्न केला. पण अनिरुद्धने नेहमी तिला उडवून लावलं. पण काहीही करून आज सोक्षमोक्ष लावायचाच अस स्नेहाने ठरवलं होत.

"येऊ का?" स्नेहाने घसा खाकरत विचारलं.

"हो." अनिरुद्ध तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याला थोड आश्चर्य वाटल. अशावेळी स्नेहा त्याला केव्हा डिस्टर्ब नाही करायची. 

"मला जरा बोलायचं होतं."

"आत्ता?" 

"हो. मला माहितेय तुझा वेगळाच मूड आहे. पण कामाच्या व्यापात वेळच मिळत नाही. एक रविवार असतो म्हणून."

"ओके."

स्नेहा त्याच्या जवळ जाऊन बसली.

"मी तुला मागे सांगितलं होतं."

"कशाविषयी?"

"माझ्याबरोबर काम करण्याबाबत."

"ओह! मला वाटत मी तुला सांगितल आहे. नॉट इंटरेस्टेड म्हणून." अनिरुद्ध पटकन म्हणाला.

"पण का?"

"मला नाही जमणार सतत धंदेवाईक विचार करून काम करण."

"पण आयुष्यात काही मिळवण्यासाठी  काही गोष्टी कराव्या लागतात."

"पण आपण दोघे इतकं कमावतो की आभाला काही कमी पडणार नाही."

"आता नाही. पुढे सगळच बदललेल असेल कदाचित."

"पुढचं पुढे बघू. मला आतातरी तुमच्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यात अजिबात रस नाही. आय विल बी मिस्फिट देअर."

"स्वतःला बदलायच नसल की लोक अशी कारण शोधतात." स्नेहा रागाने म्हणाली.

"स्नेहा मला मुलांना शिकवायला आवडत. किती सर्जनशील आणि उत्साही असतात ही मुलं. एकदम कोरी. त्यांच्या चैतन्याने आपला उत्साह वाढतो. त्यांच्या समस्या सोडवण, त्यांना मार्गदर्शन करण, त्यांच्या कलाकृती ने त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद पाहणं. हे सगळ मी एन्जॉय करतो. माझाही हात चालू राहतो. कॉम्प्युटरवरच्या रंगात काम करण्यापेक्षा खऱ्या रंगात मी जास्त रमतो. मोकळ्या वेळात माझी पेंटिंग बनतात. सेलही होतात. केव्हातरी शाळेच्या स्किटसाठी लिहितो. खूप क्रिएटिव्ह आहे सगळ. हे सगळ सोडून तुमच्या उपयोजित कलेकडे मला यायचं नाही."

"तुला तर काहीच समजत नाही."

"तुलाच काही समजत नाही. तूच किती बदलली आहेस. आपण या कित्येक दिवसांमध्ये कुठे बाहेर गेलो नाही. एकत्र बसून गप्पा मारल्या नाहीत. सतत तुझ्या मीटिंग्ज, फोन. यंत्रमानवासारख झालंय तुझं आयुष्य. लूक एट युअरसेल्फ. मला आवडणाऱ्या कुरळ्या केसांच्या बटा तुझ्या चेहऱ्यावर येत नाहीत. या काळ्याभोर गहिऱ्या डोळ्यातून तू माझ्याकडे पाहत नाहीस आणि तुझे हे पुश्ट अधर पूर्वीसारखा प्रेमाचा वर्षाव करत नाहीत."

"बस! अनिरुद्ध तुला जास्त झालेली दिसतेय. मी एका गंभीर विषयावर बोलतेय आणि तुझं काहीतरी वेगळच चाललंय."

"बायकोशी प्रेमाच्या गोष्टी करणार नाही तर कोणाशी करणार!"

"हेच ते सारखं कला,प्रेम, भावना! याही पलीकडे आयुष्य असत." स्नेहा ओरडून म्हणाली.

"हे नसेल तर आयुष्यात उरत काय?" अनिरुद्धने स्नेहाच्या डोळ्यात पाहत म्हटल.

यावर स्नेहा शांत बसली. पण नंतर स्वतःला सावरत म्हणाली.

"हे बघ अनिरुद्ध, आता मी तुला शेवटच विचारते. तू माझ्याबरोबर काम करणार आहेस की नाही?"

"शेवटच! म्हणजे? व्हॉट डू यू मीन?"

"नाहीतर मी आभाला घेऊन इथून निघून जाईन."स्नेहा निर्धाराने म्हणाली.

"आर यू सीरियस?"

"हो." स्नेहा म्हणाली.

आता मात्र अनिरुद्ध हडबडला. तो तिच्या अगदी जवळ गेला आणि तिचे हात पकडून म्हणाला.

"ए स्नेहा, अस करू नकोस यार."

"मी कंटाळले आहे आता तुला. तुझ्याबरोबरचे मित्र बघ कुठल्या कुठे पोचले. आणि काय चाललंय तुझं. तुला आमची चिंता नाही का?"

"अस कस बोलतेस तू स्नेहा? कलाकार होणे हा काय गुन्हा आहे! आता तू पैसा आणि प्रॉपर्टीशी तुलना करायला लागलीस. पण कधीकाळी माझ्या यांच गुणांवर तू प्रेम केलं होतस."

"काळ बदलतो. माणसाने पण बदलाव जरा तरी."

"का? आम्ही कलाकारांनी तर हे जग घडवलं. त्याला सुंदर केलं. निर्जीव वस्तूंना रंग, आकार दिले. दगडातून शिल्पे कोरली. चंद्र, सूर्य आणि तारे आमच्या कलाकृतींचे भाग बनले. प्रेमिकांना प्रेयसीसाठी सुंदर ओळी दिल्या. तिच्या सौंदर्याला चित्र आणि कवितेचा भाग बनवलं. आम्ही जर आमचं काम थांबवलं तर हे जग नीरस, एकसुरी आणि निर्जीव होऊन जाईल. आम्ही नाही बदलणार. मी नाही बदलणार. तुमच्या ठरवलेल्या चौकटीत मला बांधू नका. सॉरी." अनिरुद्ध स्नेहापुढे हात जोडत म्हणाला.

"हा तुझा अंतिम निर्णय आहे?"

"हो." अनिरुद्ध ठामपणे म्हणाला.

"मग गुडबाय. मी तर इथून जाणारच पण बरोबर आभाला पण घेऊन जाणार." 

स्नेहा उठून उभी राहत म्हणाली.

"काय! तुला जायचं तर जा. पण आभाला नको नेऊ." 

"मला आता कोणतीच रिस्क घ्यायची नाही. आभा माझ्याबरोबरच येईल." स्नेहाने आज एकदम ठाम निश्चयच केला होता. तिचा एकूण आविर्भाव पाहून काय बोलावं हे अनिरुद्धला सुचत नव्हतं.

"ओके." तो हताश होऊन म्हणाला.

स्नेहा निघून गेली. अनिरुद्धने ग्लासातला पेग संपवला. अजून एक पेग बनवला आणि शांतपणे पित बसला.

या प्रसंगानंतर स्नेहा तिच्या माहेरी आली होती. नंतर ती तिच्या कामात बिझी झाली. जवळजवळ तीन चार महिने तिचा आणि अनिरुद्धचा कोणताच संपर्क नव्हता आणि आता अचानक ही बातमी आली.

     टीव्हीवरची बातमी पाहून स्नेहा खूप डिस्टर्ब झाली होती. तिच्या मनाची घालमेल पाहून तिच्या मम्मीने तिच्याशी बोलायच ठरवलं. 

"स्नेहा, बेटा तुला जर एवढं वाटत तर तुला बघायला का जात नाहीस?"

"मी?"

"हो. माणसाने एवढं पण दगडासारख राहू नये."

"दगडासारख?"

"हो. एकदम भावनाशून्य होऊन कस चालेल?"

"जाते उद्या सकाळी. आज काय त्याला न्यूज चॅनलवाल्यांचा गराडा पडलाय."

"जाताना आभाला पण घेऊन जा. काय उड्या मारत होती पप्पाला टीव्हीवर बघून. लगेच फोन पण केला त्याला." मम्मी हसत म्हणाली.

"हो. सर्कसच आहे नुसती. जसा बाप तशी पोरगी."

स्नेहा दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेली. रिसेप्शनला तिने विचारलं.

"अनिरुद्ध कोणत्या रूममध्ये आहेत?"

रिसेप्शनिस्ट ने नंबर सांगितला.

"आपण कोण?" तिने विचारलं.

"मी त्यांची वाइफ."

"ओह! लकी आहात तुम्ही."

"का?"

"यु गॉट सच ए ब्रेव्ह हजबंड."

स्नेहाने खांदे उडवले आणि ती अनिरुद्ध च्या रूमकडे चालू लागली.

     ती जेव्हा त्याच्या वॉर्ड मध्ये गेली तेव्हा बेडवर कोणीच नव्हतं. ती बसून राहिली. थोड्या वेळाने अनिरुद्ध वॉशरूममधून बाहेर आला. मानेवर रुळणारे केस, दाढी वाढली होती. तो त्याच्या मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.  तो जसा जवळ आला. तस तिला सिगरेटचा वास आला.

"तू इथे स्मोकिंग केलंस?"

"हो."

"अनिरुद्ध हे हॉस्पिटल आहे. इथे तू अस काही करू शकत नाहीस."

"ओके. वेट. आलोच मी." अस बोलून अनिरुद्ध पुन्हा आत गेला. व्यवस्थित ब्रश वगैरे करून बाहेर आला. 

"हां. आता बोल."

"तू बस तरी."

अनिरुद्ध बेडवर बसला. 

"आता तू खुश असशील ना?"

"म्हणजे?"

"तुझं आता नाव झालं. तू टीव्ही वर झळकलास. प्रसिद्धी मिळाली."

"पण त्यासाठी मी काहीच केलं नाही. सगळ सहज घडून गेलं. एक बस जळत होती. लहान मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत होती. सगळे लोक पुतळ्यासारखे स्तब्ध होऊन बघत होते. म्हटल आता काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी गेलो."

"अरे पण फायर ब्रिगेडची माणसं होती ना तिथे!"

"त्यांची संख्या कमी होती. त्यांना बोलवण्याएवढा सुध्दा वेळ नव्हता. आणि कसं आहे ना तुमच्या आयुष्यात केव्हातरीच असा क्षण येतो. तो सिल्वेस्टर स्टॅलोन बोलतो ना,

वन्स इन वन्स लाईफ फॉर वन मोर्टल मोमेंट, वन मस्ट मेक अ ग्रॅब फॉर इमोरटलिटी; इफ नॉट, वन हॅज नॉट लिवड. काही क्षण तुम्हाला अमर बनवतात. असे क्षण तुम्ही सोडले नाही पाहिजेत. नाहीतर तुम्ही जगलातच नाही."

"बरोब्बर पप्पा!" एवढं बोलून आभा उड्या मारत आत शिरली आणि सरळ अनिरुद्धच्या बेडवर उडी मारली. 

"अग! हळू. पाडतेस की काय त्याला."

"असू दे." अनिरुद्ध हसत म्हणाला.

"पप्पा मला तुझ्याबरोबर एक सेल्फी पाहिजे. सगळ्यांना दाखवणार आहे मी. माय डॅडी हिरो." आभा हात उंचावत म्हणाली.

आभाने अनिरुद्ध बरोबर एक सेल्फी घेतली. पप्पाची पप्पी घेतली.

"झालं तुझं? आता बाहेर वाट बघ." स्नेहा गंभीर सूरात म्हणाली.

"खूप सीरियस चालू आहे का काही?" एकूणच दोघांचे चेहरे पाहून आभा म्हणाली.

"काही नाही. आम्ही बोलावतो तुला परत." अनिरुद्ध म्हणाला.

थोडा वेळ शांततेत गेला. नंतर स्नेहाने सुरुवात केली.

"अनिरुद्ध तुला काही कळत का? कालपासून मला झोप नाही. तो व्हिडिओ पाहताना तर माझ्या काळजाचं काय झालं माझं मला माहित. थोडा जरी उशीर झाला असता तर किती विपरीत प्रसंग घडला असता. आणि तू जी ही हॉलिवूड स्टारची वाक्य फेकतोस ना, ते सर्व काळजी घेऊन शूटिंग करतात. तू जे केलंस ते खर होत. वास्तव होत. तुला काहीच वाटत नाही का? आपल्यामागे कोणीतरी आहे. मी आहे. आभा आहे." स्नेहाने रडवेल्या सूरात विचारलं.

"असत ग लक्षात. तुम्हाला कसं विसरेन. तुझ्यावर तर मी प्रेम केलय. तू आणि आभा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहात. पण त्या दिवशीचा प्रसंग. अचानक आग लागली. आम्ही सर्व मुलांना ग्राऊंडवर घेऊन येत होतो आणि पेटलेल्या बसमधून एका मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. पण कोणीच तिला वाचवायला पुढे जात नव्हतं. मला तिच्या रूपात आपली आभाच दिसली. तशीच निरागस, निष्पाप पण हतबल आणि मी वेगाने धावत सुटलो. पुढचं सगळ तुला माहित आहेच."

स्नेहा खूप शांतपणे ऐकत होती. ती अनिरुद्धला बऱ्याच दिवसांनी पाहत होती.

"तुला बरच लागलं आहे अनिरुद्ध. जखमा किती झाल्या आहेत!"

"नाही. एवढ्या काही खास नाहीत."

"मग, उगाच लावल्यात का पट्ट्या?"

"नाही. डॉक्टरच बोलले. नॉट सीरियस."

"थोडा बारीक झाला आहेस."

"आमची अन्नपूर्णा नाही ना घरी."

"आई घरी नाहीत?"

"नाही. तीच कॅटरॅक्टच ऑपरेशन झालं. ताईकडे आहे."

"मग आता जेवणाच कस काय?"

"हॉटेल, केव्हा मालवणकर ताई."

"तिची मुलगी येते का घरी?"

"हो. ताई डबा पाठवतात ना."

"जरा आगाऊच आहे."

"कोण?"

"मालवणकरांची मुलगी."

"अग या वयात अशाच असतात मुली."

"आणि शाळेत काय करतोस?"

"मीना टीचर आणते. केव्हा बाहेर खातो."

"बरे भेटतात तुला एकेक."

"कस आहे ना स्नेहा, आपण सर्वांशी नीट वागल की सगळे चांगलेच वागतात आपल्याशी."

"एवढं सगळ झालं पण केव्हा बोलला नाहीस?"

"तू तरी कुठे मला फोन केलास?"

"कामाच्या व्यापात विसरूनच गेले. मी पण पूर्वी बनवायचे तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे पदार्थ."

"कोणे एके काळी. कोथिंबीर वड्या, फ्राईड राइस, झिंगा फ्राय, चिकन बिर्याणी आणि फ्राईड बोंबील. आहा!"

"ते तर तुला चकणा म्हणून लागायचे." एवढं बोलून स्नेहाने जीभ चावली.

"बरं मी निघते. तुझ्या फेवरेटला पाठवते."

"हो."

"आभा, ये बेटा आत."

स्नेहाने हाक मारल्यावर आभा आत आली आणि स्नेहा बाहेर पडली.


स्नेहा घरी पोचल्यावर आईने विचारल.

"कसा आहे अनिरुद्ध आता?"

"तो कसा असणार? मजेत आहे. चिंता तर दुसऱ्यांनाच असते. पण थोडा बारीक झालाय. आई पण घरी नाहीत. त्यांचं कॅटरॅक्टच ऑपरेशन झालंय. जेवणाची थोडी आबाळ होतेय अस वाटतंय."

"मी एक सांगू तुला? ऐकशील का?"

"सांग तरी."

"स्नेहा, प्रत्येक माणूस वेगळा असतो. निसर्गच आहे तसा. निसर्गात कुठे सगळ सारखं असत. प्रत्येक झाड वेगळं, फुलं वेगळी, प्राणी, पक्षी सगळ  वेगवेगळ असत.माणसाचं सुद्धा तसच. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. आपल्याला स्वीकारावं लागत. आणि आपल्या माणसाला तर जास्त. हे बघ दोन प्रेमी जीवांमध्ये दुरावा येतो. पण तो लवकर संपवण्याचे प्रयत्न केले नाही तर दरी तयार होते."

"हो. पण मीच का?"

"निघून तर तूच आलीस. त्याने सांगितलं का जायला?"

"नाही."

"मग? आणि तो वाईट कुठे आहे. त्याला त्याच्या पद्धतीने जगू दे. तू तुझ्या पद्धतीने जग. तुला तर काही करण्यापासून त्याने रोखल नाही ना? "

"नाही."

"अजूनही प्रेम करतेस त्याच्यावर."

"हो. म्हणजे परवाच्या प्रसंगानंतर तर जास्तच जाणवतंय."

"मग कशाला ताणून धरतेस? केव्हाकेव्हा इतर कशापेक्षाही हृदयाचं ऐकावं."

"हो. बरोबर बोलतेस तू मम्मा." स्नेहा विचार करत म्हणाली

   

स्नेहा आणि आभा गेल्यावर अनिरुद्ध शांतपणे बेडवर पडून विचार करत होता. या दोघी आल्या आणि खूप बरं वाटलं. विशेषतः स्नेहा आली म्हणून. आज तिच्या डोळ्यात पुन्हा तेच प्रेम दिसलं. आपल्याविषयी आस्था, कळकळ दिसली. पण तिचा हट्ट पुरवण काही आपल्याला शक्य होणार नाही. पण तिचं अस्तित्व अजूनही सुखावून जात. थोडा वेळ का होईना तिच्या सहवासाने आपला मूडच बदलून गेला. अनिरुद्ध त्याच्या विचाराच्या तंद्रीत होता. तितक्यात बाजूच्या बेडवरच्या काकांनी त्याला हाक मारली.

"काय मोरे! आज एकदम खुशीत दिसताय."

"का नसणार. त्यांच्या मिसेस आल्या होत्या." नर्स मिश्किल सूरात म्हणाली.

"तेव्हाच! तरी म्हटल मोरेंचा चेहरा कसा खुलला."

"तस नाही हो काका." अनिरुध्द हसत म्हणाला.

"अजून एक चांगली बातमी आहे."

"आणखी काय?" काकांनी विचारलं.

"यांना उद्या सकाळी डिस्चार्ज देणार आहेत."

"अरे व्वा! बातमी चांगली आहे. पण आम्ही नाराज आहोत."

"का बरं?" नर्स ने विचारलं.

"आमचा रमीचा पार्टनर गेला." काका हसत म्हणाले.

दुसऱ्या दिवशी अनिरुद्धला डिस्चार्ज मिळाला. त्याला न्यायला शाळेतले त्याचे विद्यार्थी, निवडक मित्र आणि शिक्षक आले होते. त्यांनी ओपन कारमधून वाजत गाजत अनिरुद्धला घरी आणल. घराजवळ देखील बरेच विद्यार्थी 'वेल कम होम' चे बॅनर घेऊन उभे होते. बिल्डींगमधील लोक सुद्धा होते. अनिरुद्ध या स्वागताने भारावून गेला.


गळ्यातले हार काढून तो घरात शिरणार तोच आईचा आवाज आला.

"थांब बाहेरच."

आणि तिने त्याची दृष्ट काढली. आता तो आत शिरणार तोच ताई म्हणाली.

"वेट. वेट. अजून एक सरप्राइज आहे. ये ग." तिने आवाज दिला आणि आतून स्नेहा ओवाळणीच तबक घेऊन आली. अनिरुद्धसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. स्नेहा गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिने केस व्यवस्थित बांधले होते. काही अल्लड बटा मुद्दाम सोडल्या होत्या. कानात सुंदर इयर रिंगज आणि नाजुकसा नेकलेस घातला होता. ती खूपच सुंदर दिसत होती.

स्नेहा ने अनिरुद्धला ओवाळल. कपाळाला टिळा लावला आणि अनिरुद्ध आत आला. सर्वांनी त्याच्यासाठी बरच काही आणल होत. त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याच एका मोठ्या साईझमध्ये चित्र काढल होत. बऱ्याच मुलांनी त्याला ग्रिटींग्ज दिली. मग सर्वांनी त्याच्याबरोबर फोटो काढले. सेल्फिज घेतल्या. थोडा वेळ थांबून सर्वजण निघून गेले. आता सगळी घरातलीच मंडळी होती.

"आई तू कशाला आलीस लगेच इकडे?" अनिरुद्ध ने विचारलं.

"अरे! तुझे जेवणाचे हाल होतात ना! म्हणून आले."

"आता मी आलेय ना." स्नेहाने त्यांच्याकडे पाहत म्हटलं.

"पण तुझं काम." अनिरुद्ध म्हणाला.

"मी सुट्टी घेतली आहे थोडे दिवस."

"अग, एवढं काही झाल नाही मला."

"ते आम्हाला ठरवू देत ना." स्नेहा दटावणीच्या सूरात म्हणाली.

त्यानंतर सगळे एकत्र जेवले. नंतर अनिरुद्ध थोडा वेळ आभाशी खेळत बसला. मग आपल्या बेडरूममध्ये गेला.

तो विचारात मग्न असताना बांगड्यांच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. स्नेहा आतमध्ये आली होती.

"झोपलास नाही अजून?"

"नाही. सगळच अनएक्सपेक्टेड झालं आज."

"काय?"

"माझं स्वागत, एवढे लोक आणि.."

"आणि काय?"

"तू परत आलीस. वाटल नव्हतं."

"जाऊ का परत?"

"नको." अनिरुद्ध एकदम मोठ्याने म्हणाला.

"मग?" स्नेहा जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

"मला सारखी तुझी आठवण यायची. मग जुने फोटो पाहत बसायचो. कविता वाचायचो, लिहायचो आणि.."

"आणि मस्त पित बसायचो." स्नेहा हसत म्हणाली.

"अस काही नाही. पण घर खायला उठायचं." आता अनिरुद्ध चे डोळे पाणावले होते.

"मग फोन नाही केलास तो?"

"तू रागावून गेली होतीस. कोणत्याही नात्यात जबरदस्ती चांगली नाही. फोर्सफुली कोणतंच नात टिकत नाही. स्वतःहून वाटल पाहिजे."

"खरतर राहवत मला पण नव्हत. पण मनाचा हट्टीपणा मान्य करत नव्हता. मग नुसती चिडचिड व्हायची. पण त्या दिवशी तुला त्या जळत्या बसमध्ये धावत जाताना पाहिलं आणि मला जे काही झालं. तेव्हाच जाणवलं की आय एम स्टिल मॅडली इन लव्ह विथ यू. तुला विसरण, तुझ्यापासून दूर राहणं मला केव्हा शक्य होणार नाही."

"खरंच?"

"हो आणि तुझ्या लाडक्या सासूबाईंनी पण चार गोष्टी सांगितल्या. प्रोफेसर आहेत ना त्या, बरोबर पटवून देतात."

"ग्रेट!" अनिरुद्ध हसत म्हणाला.

"पण आज एवढा शृंगार, साडी वगैरे?"

"तुला आवडत ना मला अस पाहायला? त्यात तू काय आता हिरो झालायस. तुझ्यावर मरणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढणार."

"काहीतरीच काय?" अनिरुद्ध म्हणाला.

"पाहिलं ना मघाशी. किती जवळ उभ राहून सेल्फी घेत होत्या. मालवणकरांच्या मुलीने तर काय तो ओठांचा चंबू केला होता आणि जवळ आली होती. मला वाटल आता तुझा किस घेते की काय! तुझ्यावर लक्ष ठेवावं लागणार."

"म्हणून परतलीस की काय?"

"नाही रे. मजा केली."

"याबाबतीत निश्चिंत रहा. इकडे अजून कोणी नाही." अनिरुद्ध छातीवर हात ठेवत म्हणाला. पण आज तू खूपच सुंदर दिसतेयस."

"हो का?"

"हो, खरच. तुझ्या सावळ्या रंगावर ही गडद निळी साडी सुंदर वाटतेय. तुझे हे लांबसडक केस, यात हरवावस वाटत. गहिऱ्या डोळ्यात डुंबावस वाटतं आणि तुझ्या या केसांच्या अल्लड बटा माझ्या मनाला अवखळ बनवताहेत."

स्नेहा अनिरुद्धच बोलण हसत ऐकत होती.

"तू अजूनही काहीतरी बोलला होतास."

"काय?"

"पुष्ट अधरांनी प्रेमवर्षाव वगैरे." स्नेहा जवळ येत म्हणाली.

"हां."

"मग करू काय?" स्नेहा अनिरुद्धच्या अजून जवळ जात म्हणाली.

तिच्या या अचानक बदललेल्या पवित्र्याने अनिरुद्ध गडबडला.

"थांब तो लाईट तर बंद करतो."

अनिरुद्धने लाईट बंद करून डिमलाईट चालू केला. स्नेहाने त्याला एकदम मिठीच मारली आणि अनिरुद्ध ओरडला.

"अग, मुका.."

"घेतेय ना मी."

"तस नाही. मुका मार लागलाय. जरा हळू."

"ओके." स्नेहा हसत म्हणाली.

ती रात्र त्यांच्या अशाच चित्रविचित्र संवाद आणि आवाजात रंगून गेली आणि दोघांमधल्या दुराव्याला संपवून गेली.


समाप्त

➖➖➖➖➖


संकलित : प्रा. माधव सावळे


आभार: कथाकोश

➖➖➖➖➖

Comments

Popular Posts

“माणुसकी – मनाला स्पर्श करणारी कथा”

माणुसकी ➖➖➖➖➖➖➖➖➖ रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफरभाईंनी आपल्या पोराला, आसिफला, हाक दिली… “ओ आसिफ… चल गाडीयां अंदर लगा.” आसिफ मित्रासोबत गप्पा मारत होता. मित्राला _ “चल उद्या सकाळी कॉलेजात भेटू” _ म्हणत त्यानं कटवलं व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला. बारा बाय दहाच्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गिर्‍हाइकाच्या  गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही, हे त्यालाही ठाऊक होतं. त्यात बारीक पाऊस चालू झाला होता. गाड्या लावून होईपर्यंत जफरभाईंनी सगळं सामान आत ठेऊन दिलं. हात धुतले व पोराकडे पाहिलं… त्यांना बरं वाटलं. _ ‘आपण नशीबवान… पोरगं कॉलेज शिकतंय आणि धंद्यात पण आपल्याला मदत करतंय. नाहीतर आपल्या भावांची पोरं… सगळीजण गॅरेजच्या कामात… पण दहावीच्या पुढे एकपण शिकला नाही.’ _ पाऊस आता वाढला होता. अजून वाढण्याआधी घरी पोहोचणं आवश्यक होतं. दुकानाचं शटर ओढून कुलूप लावून जफरभाई वळणार, तोच एक तरुण जोडपं गाडी ढकलत त्यांच्या दरवाज्याशी आलं. बाइकवर आधीच जाऊन बसलेला आसिफ लगेचच म्हणाला, _ “दुकान बंद हुआ भाई…!” _ जफरभाईंनी आसिफकडे फक्त एक कटाक्ष...

अजेय : योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी

"अजेय" 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म 'अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी' का सरल हिंदी भाषा में रिव्यू पढ़ें। जानें कैसी है मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की यह बायोपिक, इसकी कहानी, कलाकारों का अभिनय और क्या आपको यह फिल्म देखनी चाहिए??? "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी": योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी ​ मुंबई: हाल ही में 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी" उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के जीवन पर आधारित एक बायोपिक है। यह फिल्म उनके प्रारंभिक जीवन से लेकर एक प्रभावशाली राजनेता बनने तक के सफर को दर्शाती है। फिल्म का निर्देशन रवींद्र गौतम ने किया है और इसमें मुख्य भूमिका में अनंत जोशी ने योगी आदित्यनाथ का किरदार निभाया है। ​यह फिल्म शांतनु गुप्ता की किताब "द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर" से प्रेरित है। फिल्म अजय सिंह बिष्ट के साधारण लड़के से योगी आदित्यनाथ बनने की कहानी को पर्दे पर लाती है, जो उत्तराखंड के एक छोटे से गाँव से निकलकर भारत के सबसे बड़े राज्य के मुख्यमंत्री पद तक पहुँचते है। ...

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का नुस्खा।

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का  नुस्खा। हमारे शरीर की अग्नि खाए गए भोजन को पचाने का काम करती है। यदि यह अग्नि किसी कारण से मंद पड़ जाए तो भोजन ठीक तरह से नही पचता है। भोजन के ठीक से नही पचने के कारण शरीर में कितने ही रोग पैदा हो जाते है। अनियमित खान पान से वायु पित्त और कफ़ दूषित हो जाते है।।जिसकी वजह से भूख लगनी बंद हो जाती है और अजीर्ण अपच वायु विकार तथा पित्त आदि की शिकायतें आने लगती है। Dadi maa ke asardar nuskhe jo bhukh badhate hai, swasthya sudharte hai aur pachan shakti majboot karte hai भूख लगनी बंद हो जाती है, शरीर टूटने लगता है, स्वाद बिगड जाता है। पेट में भारीपन महसूस होने लगता है। पेट खराब होने से दिमाग खराब रहना चालू हो जाता है अथवा समझ लीजिये कि शरीर का पूरा का पूरातंत्र ही खराब हो जाता है। इसके लिये मंन्दाग्नि से हमेशा बचना चाहिए और तकलीफ़ होने पर इन दवाओं का प्रयोग करना चाहिए। भूख नही लगने पर आधा माशा फूला हुआ सुहागा एक कप गुनगुने पानी में दो तीन बार लेने से भूख खुल जाती है। काला नमक चाटने से गैस खारिज होती है, और भूख बढती है। यह नमक पेट को भी साफ़ करता है...

विसर्जन

"विसर्जन'' ➖➖➖➖➖ पहाटेचे पाच वाजले तसें काशिनाथ रावांना जाग आली, ही त्यांची रोजचीच वेळ, आत उठून काय करायचे हा त्याच्या पुढे प्रश्न. बेडरूम मध्ये मुलगा प्रमोद आणि सून प्रणिता नातू आदर्श झोपलेले. काशिनाथराव आणि त्यांची पत्नी हॉलमध्ये, त्यांच्या पत्नीला गुढगे दुखी त्यामुळे ती वर कोचवर आणि खाली चटईवर काशिनाथराव. काशिनाथराव चुळबुळ करत पडून राहिले, त्याना माहित होत, यावेळी आपण उठलो तर सर्वांच्या तोफखण्याला तोंड द्यावे लागेल, त्यापेक्षा गुपचूप पडून राहावे. चहा चा वास आला की हळूच उठावे, कोणी चहा दिला तर गुपचूप घ्यावा. आपली परिस्थितीच तशी आली आहे किंवा घरातील इतरांनी आपली परिस्थिती घरातील झाडू सारखी केली आहे. काशिनाथ रावांनी निश्वास टाकला. पैसे न कमावणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती ही अशीच. काशिनाथरावांची पत्नी उठली आणि तिने चहा ठेवला हे त्यांनी ऐकले आणि ते हळूच उठले आणि बाथरूममध्ये गेले, चहा झाल्यावर ती मुलाला आणि सुनेला हाक मारायला त्याच्या बेडरूम जवळ गेली आणि दारावर थापा मारू लागली, हे त्यांनी ऐकले. त्याना वाटले ती आता आपल्याला चहा देईल, या आशेवर ते कोचवर बसून राहिले. तेप...

दादी माँ ने बताया "बुखार" का आयुर्वेदिक इलाज

दादी माँ ने बताया "बुखार" का आयुर्वेदिक इलाज   "बुखार" बदलते मौसम में बुखार की चपेट में आना एक आम बात है। कभी वायरल फीवर के नाम पर तो कभी मलेरिया जैसे नामों से यह सभी को अपनी चपेट में ले लेता है। "Fever ka ayurvedic ilaj janiye. Dadi maa ke nuskhe se bukhar kam karne ke herbal aur natural remedies in Hindi." #Ayurveda #HomeRemedies #FeverCure #NaturalTreatment #DadiMaaKeNuskhe #HerbalMedicine #HealthTips फिर बड़ा आदमी हो या कोई बच्चा इस बीमारी की चपेट में आकर कई परेशानियों से घिर जाते हैं। कई बुखार तो ऐसे हैं जो बहुत दिनों तक आदमी को अपनी चपेट में रखकर उसे पूरी तरह से कमजोर बना देता है। पर घबराइए नहीं सभी तरह के बुखार की एक अचूक दवा है भुना नमक। इसके प्रयोग किसी भी तरह के बुखार को उतार देता है। भुना नमक बनाने की विधि खाने मे इस्तेमाल आने वाला सादा नमक लेकर उसे तवे पर डालकर धीमी आंच पर सेकें। जब इसका कलर कॉफी जैसा काला भूरा हो जाए तो उतार कर ठण्डा करें। ठण्डा हो जाने पर एक शीशी में भरकर रखें। जब आपको ये महसूस होने लगे की आपको बुखार आ सकता है तो बुखार आने से...

निर्णय

 ⚙️ 🈸 निर्णय ➖➖➖➖➖ काल साडेपाच चा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणं तो दहा मिनिटं Snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं.  पाच चाळीस ला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखे पिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून.  नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला.  पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं… पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता. चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना.  तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन. हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला विशेष गाडी मिळते. थोडं टेकायला मिळतं बूड, चौथ्या सीटवर तरी. प्रातर्विधी उरकले पटापट, भसाभसा दात घासले यंत्रवत, आधण ठेवलं चहासाठी आणि कणकेचा डबा उघडला. सकाळी उठून कणिक भिजवायची म्हणजे चिडचिड नुसती! एकीकडे, कालच घरी येताना आणलेली, निवडलेली, फरसबी धुवून घेतली.  चहा घेऊन जरा बरं वाटलं. तात्पुरता दिलासा, थकलेल्या शरीराला आणि मनाला.  उसासा टाकून उठले, घड...

निरपेक्ष

'निरपेक्ष' ➖➖➖➖➖ त्याचं ड्रिंक संपवून तो बिल मागवणारच होता,  इतक्यात  'ती' मुलगी त्याच्या टेबल जवळ आली. ब-याच वेळेपासून ती त्याच्यावर नजर लावून बसली होती. एकवीस-बावीस वर्षे वय असावं तिचं फार तर फार. त्याने तोवर तिच्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते. शेवटी धाडस करुन ती त्याच्यासमोर येउन उभी राहिली. 'सो..हँडसम..शनिवारची रात्र आहे..हाउ अबौट सम फन?' त्याने तिच्याकडे पाहिलं... त्याला प्रेटी वूमन मधल्या ज्युलीया राॕबर्टसची उगीचच आठवण झाली. म्हणजे रिचर्ड गिअर... स्वतःच्या मनात आलेल्या विचारांना तो हसला व तिला म्हणाला 'सॉरी मिस..नाॕट इंटरेस्टेड' ती थोडीशी नाराज झाली.. पण मग एका वेगळ्याच निर्धाराने त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसली. शांतपणे एक सिगारेट शिलगावत त्याला म्हणाली 'कमीटेड आहेस? मी पहातेय तु एकटाच आहेस..असतोस. नेहमी विकेंड्सना बघते इथे तुला..एकटाच येतोस..बिअर पितोस..जातोस..कधी कोणी मुलगी बरोबर नसते.' सिगरेटचा एक झुरका घेत ती हळू आवाजात मिश्कीलपणे म्हणाली  'प्लीज 'गे' आहेस असं सांगू नको मला आता..' तो परत हसला. तिने सोडलेल्या ...