❇️ दुरावा ➖➖➖➖➖➖➖➖➖ स्नेहा ऑफिसमधून परतली आणि सोफ्यावर विसावली. डोअर बेल वाजली म्हणून तिने दरवाजा उघडला. तर बाहेर तिचे वडील उभे होते. "पप्पा! आज लवकर?" "हो. कारणच तस आहे." "म्हणजे?" "तो टीव्ही लाव आधी." "कशाला?" "तुझा नवरा हिरो झालाय आज." पप्पा थोड्या उत्साहाने म्हणाले. "म्हणजे! मला समजल नाही." "थांब. मीच टीव्ही लावतो." अस बोलून त्यांनी रिमोट हातात घेतला आणि चॅनल बदलायला सुरुवात केली. "हां. बघ आता." स्नेहाने पाहिलं. टीव्हीवर न्यूज येत होती. स्कूल टीचर बीकम्स हिरो आणि अनिरुद्धचा फोटो तिला दिसला. त्याला जखमी अवस्थेमध्ये स्ट्रेचरवरून घेऊन जात होते. त्यानंतर एक व्हिडिओ दाखवला. त्यात अनिरुद्ध एका जळत्या बसकडे धावत जाताना दिसत होता. मागे शाळेला आग लागलेली दिसत होती. लोक ओरडत होते. अनिरुद्ध धावत जळत्या बसमध्ये गेला आणि थोड्या वेळाने एका मुलीला खांद्यावर घेऊन परतला. आणि..आणि काही क्षणातच त्या बसमध्ये स्फोट झाला आणि ती पूर्णपणे खाक झाली. स्नेहा डोळे विस्फारून सर्व पाहत होती. तिला सगळंच फार धक्कादाय...
Welcome to Atmarider – your one-stop destination for Trending Viral News and full Entertainment dose! Here you’ll find the latest Recipes, World updates, Music, Songs, and Movie Reviews. Explore meaningful Poetry, thoughts on God and Love, along with Ayurvedic remedies for a healthier lifestyle. Stay connected with Atmarider for fresh, engaging, and trending content every day.