'निरपेक्ष' ➖➖➖➖➖ त्याचं ड्रिंक संपवून तो बिल मागवणारच होता, इतक्यात 'ती' मुलगी त्याच्या टेबल जवळ आली. ब-याच वेळेपासून ती त्याच्यावर नजर लावून बसली होती. एकवीस-बावीस वर्षे वय असावं तिचं फार तर फार. त्याने तोवर तिच्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते. शेवटी धाडस करुन ती त्याच्यासमोर येउन उभी राहिली. 'सो..हँडसम..शनिवारची रात्र आहे..हाउ अबौट सम फन?' त्याने तिच्याकडे पाहिलं... त्याला प्रेटी वूमन मधल्या ज्युलीया राॕबर्टसची उगीचच आठवण झाली. म्हणजे रिचर्ड गिअर... स्वतःच्या मनात आलेल्या विचारांना तो हसला व तिला म्हणाला 'सॉरी मिस..नाॕट इंटरेस्टेड' ती थोडीशी नाराज झाली.. पण मग एका वेगळ्याच निर्धाराने त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसली. शांतपणे एक सिगारेट शिलगावत त्याला म्हणाली 'कमीटेड आहेस? मी पहातेय तु एकटाच आहेस..असतोस. नेहमी विकेंड्सना बघते इथे तुला..एकटाच येतोस..बिअर पितोस..जातोस..कधी कोणी मुलगी बरोबर नसते.' सिगरेटचा एक झुरका घेत ती हळू आवाजात मिश्कीलपणे म्हणाली 'प्लीज 'गे' आहेस असं सांगू नको मला आता..' तो परत हसला. तिने सोडलेल्या ...
⚙️ 🈸 निर्णय ➖➖➖➖➖ काल साडेपाच चा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणं तो दहा मिनिटं Snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं. पाच चाळीस ला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखे पिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून. नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला. पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं… पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता. चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना. तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन. हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला विशेष गाडी मिळते. थोडं टेकायला मिळतं बूड, चौथ्या सीटवर तरी. प्रातर्विधी उरकले पटापट, भसाभसा दात घासले यंत्रवत, आधण ठेवलं चहासाठी आणि कणकेचा डबा उघडला. सकाळी उठून कणिक भिजवायची म्हणजे चिडचिड नुसती! एकीकडे, कालच घरी येताना आणलेली, निवडलेली, फरसबी धुवून घेतली. चहा घेऊन जरा बरं वाटलं. तात्पुरता दिलासा, थकलेल्या शरीराला आणि मनाला. उसासा टाकून उठले, घड...