Skip to main content

निरपेक्ष

'निरपेक्ष'

➖➖➖➖➖


निरपेक्ष


त्याचं ड्रिंक संपवून तो बिल मागवणारच होता,  इतक्यात  'ती' मुलगी त्याच्या टेबल जवळ आली. ब-याच वेळेपासून ती त्याच्यावर नजर लावून बसली होती. एकवीस-बावीस वर्षे वय असावं तिचं फार तर फार. त्याने तोवर तिच्याकडे फारसे लक्षही दिले नव्हते.

शेवटी धाडस करुन ती त्याच्यासमोर येउन उभी राहिली.
'सो..हँडसम..शनिवारची रात्र आहे..हाउ अबौट सम फन?'

त्याने तिच्याकडे पाहिलं...


त्याला प्रेटी वूमन मधल्या ज्युलीया राॕबर्टसची उगीचच आठवण झाली. म्हणजे रिचर्ड गिअर...

स्वतःच्या मनात आलेल्या विचारांना तो हसला व तिला म्हणाला 'सॉरी मिस..नाॕट इंटरेस्टेड'

ती थोडीशी नाराज झाली..
पण मग एका वेगळ्याच निर्धाराने त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसली. शांतपणे एक सिगारेट शिलगावत त्याला म्हणाली
'कमीटेड आहेस? मी पहातेय तु एकटाच आहेस..असतोस. नेहमी विकेंड्सना बघते इथे तुला..एकटाच येतोस..बिअर पितोस..जातोस..कधी कोणी मुलगी बरोबर नसते.'
सिगरेटचा एक झुरका घेत ती हळू आवाजात मिश्कीलपणे म्हणाली  'प्लीज 'गे' आहेस असं सांगू नको मला आता..'

तो परत हसला. तिने सोडलेल्या सिगारेटचा धूर हलकेच हाताने दूर सारत तो म्हणाला, 'नाही मी 'गे' नाहीये..एवढच समज की मला यात इंटरेस्ट नाही'.

ती तिच्या खुर्चीत रेलली. तिची फिगर आता अधीकच उठावदार भासत होती. कदाचित् हे जाणूनबुजून होतं..पार्ट आॕफ बिझनेस.

त्याने त्याची नजर तिच्या चेह-यावर रोखून ठेवली होती.नजर खाली घसरु न देण्यासाठी परिश्रम पडत होते.

ती एक सुस्कारा टाकत म्हणाली
'मला एखादं ड्रिंक तरी आॕर्डर करशील का, की तेही नाही?'

तो हसला. मागे वळून त्याने बार अटेंडंट ला हात केला..
'ओके..काय चालेल तुला?'
ती त्याला डोळा मारत हळूच म्हणाली
'तसं तर बरंच काही चालेल डिअर..पण सध्या एक ग्लास वाईनच मागव..'

त्याने तिच्यासाठी वाईन मागवलं व तिला कंपनी देण्यासाठी स्वतःला एक टिन बिअर मागवली.

'सो हँडसम..तु जवळपास राहतोस का?' तिने विचारलं.

त्याला तिच्या प्रश्नाचा रोख आवडला नाही हे त्याच्या चेह-यावरुन तिच्या लक्षात आलं. तरीही त्याने उत्तर दिले
'हो मी जवळपास राहतो..'
त्याने मागवलेल्या बिअरचा एक सिप घेत तो म्हणाला
'पण ही चौकशी का? काय कामाची ही तुला?'

'वेल...ते तुझ्यावरच अवलंबून आहे..' ती भुवया उडवत म्हणाली, 'तु जवळ राहतोस हे आपल्या 'दोघांच्याही' कामाचं होउ शकतं..फक्त 'माझ्याच' नाही काही..'

'हे बघ..' तो आता थोडासा रागावून म्हणाला,'मी तुला बोललोय, मला यात इंटरेस्ट नाहीय...तरीही तु का मागे पडतेहेस माझ्या..तुला या नाइट क्लबमधे इतर कंपनी मिळणार नाही का?'
भोवताली एक नजर टाकत तो पुढे म्हणाला 'मला तर तुझ्यावर खिळलेल्या ब-याच नजरा दिसताहेत या बार मधे..'

तिने आपला वाईनचा ग्लास उचलला, एकाच दमात अर्धा अधीक संपवला व खाली ठेवत त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली 'मी भले एक काॕलगर्ल असेन, डार्लींग, बट आय टू हॕव चाॕइसेस..!!'

 
तो पुढे काही बोलला नाही...

काही वेळ स्तब्ध शांततेत गेला. बार मधील इतर लोक मात्र त्यांच्यावर नजर ठेउन होते. तो तिच्या 'गळाला लागतो' का याची त्यांना जास्त उत्सुकता होती.

तिची वाईन संपेपर्यंत त्याने वाट पाहिली.
'बरं..आता मला निघायला हवं..' आपलं घड्याळ पहात तो म्हणाला 'तुला ड्रिंक मागवायचं असेल अजून तर मागवू शकतेस.. मी पे करुन जाइन..'

तो निघणार या विचाराने तिचा चेहरा पडला.
प्रश्न पैशाचा नव्हता. त्याच्यात काही खास होतं..

ती त्याच्या डोळ्यात खोल पहात म्हणाली..
'तु मला खरच घरी घेउन जाउ शकत नाहीस? बघ विचार कर.. जर नेलस तर तुझा अपेक्षाभंग होणार नाही... माय प्राॕमीस..!'

मग काही तरी सुचून म्हणाली.. 'हे बघ मी तुझ्याबरोबर आल्याने तुला आॕकवर्ड वाटत असेल तर मला तुझी सोसायटी व फ्लॕट नंबर सांग.. मी पोहोचून जाईन..'

त्याने तिच्याकडे पाहिले.. व तो पुन्हा  हसला.

ओह.. त्याचं ते हसणं.. वेड लावणारं होतं त्याच हसणं.. जीव ओवाळून टाकावं असं.

'ठीक आहे' तो अचानक म्हणाला व ती भानावर आली,
'तु येतेहेस माझ्याबरोबर.. पण एका अटीवर.... ज्याक्षणी मी तुला जायला सांगेन त्या क्षणी तुला माझ्या घरातून निघून जायला लागेल.. कुठलेही आढेवेढे न घेता.. मान्य आहे तुला?'

'ओह.. यस..' लगेच आपल्या जागेवरुन उठत ती म्हणाली. आपल्या कानांवर व नशिबावर तिचा त्याक्षणी विश्वास बसत नव्हता.

त्याने बिल भरलं व त्यांनी तो नाइट क्लब एकत्र सोडला. क्लबमधले इतर मुली व पुरुष एक सुस्कारा टाकत त्यांना जाताना पहात राहिले.

तो रहायचा ती सोसायटी जवळच होती. त्याच्या होंडा सिटी मधे बसल्या पासून दहाव्या मिनीटाला ते त्याच्या फ्लॕटच्या दारात होते. त्याने त्याच्या जवळच्या चावीने दरवाजा उघडला व आत गेला.

दरवाजातून आत येताच त्या सुरेख हाॕलमधे तिला पहिली गोष्ट जी नजरेत भरली ती म्हणजे एक मोठा फोटो. त्या फोटोत 'तो' होता व एक खूप 'गोड चेहरा' होता.. तो झब्बा कुर्ता मधे व 'ती' साडी मधे.

म्हणजे महाशय शादीशुदा आहेत तर.. पण बायको इथे याच्याजवळ नसते बहुधा.. कदाचित....

'हो.. ती माझी बायकोच आहे.. प्रिया..' तिचा चेहरा वाचत तो म्हणाला..' आणि... आम्ही बरोबरच राहतो..'

त्याने पुढे होत हाॕल लगतचा एक दरवाजा उघडला आणि शांतपणे तिच्याकडे पहात म्हणाला 'ती या खोलीत आहे..'

त्याच्या त्या वाक्याने ती मात्र हादरुन गेली.
"हा माणूस वेडा आहे का.. याची बायको घरात आहे आणि हा 'मला' घरी घेउन आलाय…" तिच्या मनात विचार आला.

त्याच्याकडे रागाने पहात ती दरवाजातून बाहेर पडायला वळणार तसा तो म्हणाला 'थांब..' ती जागीच थबकली.

त्याने पुढे येउन तिचा हात पकडला व तिला शांतपणे त्या खोलीकडे घेउन आला. तिला काहीच समजत नव्हत तो काय करतोय. ती निमुट त्याच्या मागे त्या बेडरुम मधे गेली.

बेडरुममधे मंद आवाजात एक लाइट वेस्टर्न संगीताची सी.डी. वाजत होती. सगळी रुम सिलींग मधे लावलेल्या छोट्या छोट्या एल.इ.डी. दिव्यांच्या प्रकाशात उजळली होती.. प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या रंगांचे आकर्षक वाॕलपेपर लावले होते..

खोलीच्या मध्यभागी एका हास्पिटल सदृश्य बेडवर 'प्रिया' झोपली होती. फोटोपेक्षाही ती इथे सुंदर दिसत होती.
तिच्या शेजारी लावलेल्या एका स्टँडवर एक सलाइनची बाटली अडकवली होती. ज्यातून थेंब थेंब पडणारे औषध बारीक नळीवाटे तिच्या शरिरात मिसळत होतं. श्वासोश्वास घेण्यासाठी एक नॕझल कॕनूला तिच्या तोंडावर होता ज्याच्या साह्याने तिचा श्वास मंदपणे चालू होता. चेह-यावरुन असं वाटत होतं की आता उठेल व म्हणेल 'हाय.. मी प्रिया..'

तिने त्याच्याकडे पाहिलं..बोलायला काही शब्दच सुचत नव्हते..
'ओह डिअर.... काय झालय हिला..?' ती कशीबशी म्हणाली.

तो सलाईनच्या बाटलीजवळ गेला.. त्याचा फ्लो थोडासा वाढवला

'प्रिया तीन वर्षांपासून कोमात आहे..' तो शांतपणे बोलला, 'तिचा एक मोठा अॕक्सिडेंट झाला तिच्या पंचविसाव्या वाढदिवशी.. मला भेटायला येताना...'
हे म्हणताना त्याच्या चेह-यावर अतीव वेदना दिसली.

'तिच्या कारला एक भरधाव ट्रकने उडवलं..' तो पुढे म्हणाला, 'पन्नास मिटर फरफटत गेली गाडी तिची..दोन वर्ष..हाॕस्पिटलमधे मृत्युशी झुंझ देत होती. मेंदुत रक्तस्त्राव.. ब्रेन हॕमरेज झाल होतं.. तीन आॕपरेशन झाली.. दोन वर्षे व्हेंटीलेटरवर होती..तिची जगण्याची जिद्दच शेवटी तिला मृत्युच्या दाढेतून परत घेउन आली..'

'ओह डिअर... ओह डिअर.. बिचारी..कसं सहन केल असेल'  ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.

तो प्रिया शेजारी खुर्चीत बसला. आपले हात सॕनिटायझरने साफ करुन त्याने तिच्या चेह-यावरुन  व केसांतून हलकेच हात फिरवला.
'आमचा साखरपुडा झाला होता.. बाहेर लावला आहे  तो फोटो आमच्या साखरपुड्यातलाच.. तिचे आई वडिल नासीकला असतात..त्यांना अजून दोन मुली आहेत प्रिया च्या पाठी..त्यांनी जेवढं करायच तेवढ खूप केलं.. पण हे प्रियाचं शुद्धीत येण्याची वाट पाहणं आता त्यांना शक्य नव्हतं.. मानसिक व आर्थिकदृष्ट्या देखील ते कोलमडले होते. मी त्यांची परवानगी घेउन हाॕस्पिटल मधून डिश्चार्ज घेण्या आधीच प्रियाशी रितसर लग्न केलं.. आणि तिला इथे घरी घेउन आलो.. हाॕस्पिटल रुम प्रमाणे इथे सगळी सोय केलीय..एक नर्स असते बारा तास..सकाळी आठपासून स़ध्याकाळी आठपर्यंत.. मग मी असतो तिच्याबरोबर...एकटाच..गप्पा मारतो तिच्याशी.. पुस्तकं वाचून दाखवतो तिला..गाणी ऐकवतो..वेस्टर्न क्लासीकल तिला आवडतं.. ते लावून ठेवतो दिवसभर तिच्यासाठी..'

त्याने तिच्याकडे पाहिलं.. 'मग तू म्हणतेस तसा मी एकटा कसा असेन? प्रिया चोवीस तास असते.. माझ्याबरोबर..'

ती त्याच्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रु होते.
त्याच्या समोर गुडघ्यावर बसली त्याचा हात धरत ती म्हणाली..
'हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल नसतं तर विश्वास बसला नसता. खरंच देव प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा मित्र, प्रियकर, नवरा का देत नाही रे. मी तुला आधी जे जे बोलले त्यासाठी खरंच मला माफ कर. माझी या घरात यायची लायकीही नाही रे..हे मंदिर आहे तुझं आणि प्रियाचं..कळायला लागलं तेंव्हापासून मी पुरुषांच्या डोळ्यात फक्त वासनाच पहात आलेय.. मी विसरलेच होते की या जगात खरं प्रेमही अस्तित्वात आहे... सच्चं.. निरपेक्ष.. प्रेम.'

डोळे पुसत व उठत ती म्हणाली 'थँक्स.. ते असतं हे मला दाखवून दिल्याबद्दल..'

आपली बॕग घेउन ती निघाली... मागे वळून तिने प्रियाकडे पाहिलं.. 'तुझी हरकत नसेल तर कॕन आय किस हर वन्स?'

'हो..नक्कीच' म्हणत त्याने सॕनिटायझर तिच्या हाती दिला.

हात स्वच्छ करुन तिने प्रियाच्या हातांना स्पर्श केला. तिच्या थंड हातांमधेही तिला एक वेगळीच उब जाणवली. तिच्या माथ्याचं चुंबन घेउन ती निघण्यासाठी उठली. तिचे डोळे पुन्हा भरुन आले होते.

त्याने तिला सोसायटीच्या गेट बाहेर सोडलं.
जाता जाता तो तिला म्हणाला 'मला हे बोलायचा कदाचित अधिकार नाही.. पण.. मला वाटतं.. तु एक चांगली मुलगी आहेस.. खूप चांगली..'

तिच्या हात हातात घेत तो पुढे म्हणाला
'एखादा छान लाइफ पार्टनर बघ..हे सर्व आता करते आहेस ते सोडून देउन आयुष्य नव्याने सुरु कर.. मला खात्री आहे.. तू नक्की यशस्वी होशील.. गुड लक..!!'

तो निघून गेला. त्याने परत वळून पाहिलं नाही..

जर पाहिल असत़ं तर त्याला ती दिसलं असती.. त्या अपार्टमेंट समोरच्या बाकावर बसलेली.. हमसून हमसून रडत..एखाद्या लहान मुलीसारखी..


समाप्त.



आभार : सुनील गोबुरे

➖➖➖➖➖

Comments

Popular Posts

दादी माँ ने बताया "पेट दर्द" का आयुर्वेदिक इलाज

पेट दर्द पेट दर्द" का आयुर्वेदिक इलाज गलत खान पान अथवा अपच के कारण होने वाले पेट दर्द के लिए आयुर्वेद में कुछ नुस्खे बताए गये हैं ! जिनका अगर प्रयोग किया जाए तो पेट दर्द कि परेशानी से बचा जा सकता है ! हालांकि इस तरह के पेट दर्द के लिए आज भी हमारे घरों में आयुर्वेदिक नुस्खे काम में लाये जाते हैं और उनसे आराम भी मिलता है ! ऐसे ही कुछ नुस्खे : - 1 . अदरक और लहसुन को बराबर कि मात्रा में पीसकर एक चम्मच कि मात्रा में पानी के साथ सेवन करने से पेट दर्द में लाभ मिलता है ! 2 . एक ग्राम काला नमक और दो ग्राम अजवायन गर्म पानी के साथ सेवन करने से पेट दर्द में लाभ मिलता है ! 3 . अमरबेल के बीजों को पानी से पीसकर बनाए गये लेप को पेट पर लगाकर कपडे से बाँधने से गैस कि तकलीफ , डकारें आना , अपानवायु न निकलना , पेट दर्द और मरोड़ जैसे कष्ट दूर हो जाते हैं ! 4 . सौंठ , हींग और कालीमिर्च का चूर्ण बराबर कि मात्रा में मिलाकर एक चम्मच कि मात्रा में गर्म पानी के साथ लेने से पेट दर्द में तुरंत आराम मिलता है ! 5 . जटामांसी , सौंठ , आंवला और काला नमक बराबर कि मात्रा में पीस लें और एक एक चम्मच कि मात्रा में तीन ब...

हरवलेले सूर

🎵 🎷   हरवलेले सूर ➖➖➖➖   "Sun & Sons" कंपनीच्या सीईओ समीरने आपल्या टीम मेंबर्सना थँक्यू म्हणत मीटिंग संपल्याची घोषणा केली व फाइल वर साइन करून ती पी.एला दिली ....           एवढ्यात इंटरकॉम वरून रिसेप्शनिस्ट बोलली.    "- सर आपल्या करता तीन अर्जंट कॉल....", समीर ने फोन रिसीव केला. चेतन चे तीन रेकॉर्डेड मेसेज होते,   समीर --सावनी  इज  सिरीयस, कम सून. दुसरा होता ----    तिला तुला भेटायचंय.‌‍‌... तिसरा--     बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट...             सावनी  सिरीयस, समीर ला काही कळेच ना, त्यांनी चेतनला कॉल केला, पण फोन लागत नव्हता.          समीरने  पीए ला बोलवून काही सूचना दिल्या...... प्रीती ला मेसेज करून मुंबईला जात असल्याचे कळवले. ड्रायव्हरला मुंबईला चलायचे सांगून समीर मागे बसला. आज मन इतके अशांत होते कि गाडी चालवणे ही धोक्याचे वाटत होते . गाडी स्टार्ट...

अजेय : योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी

"अजेय" 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म 'अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी' का सरल हिंदी भाषा में रिव्यू पढ़ें। जानें कैसी है मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की यह बायोपिक, इसकी कहानी, कलाकारों का अभिनय और क्या आपको यह फिल्म देखनी चाहिए??? "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी": योगी आदित्यनाथ के जीवन की अनकही कहानी ​ मुंबई: हाल ही में 19 सितंबर 2025 को रिलीज़ हुई फिल्म "अजेय: एन अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी" उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के जीवन पर आधारित एक बायोपिक है। यह फिल्म उनके प्रारंभिक जीवन से लेकर एक प्रभावशाली राजनेता बनने तक के सफर को दर्शाती है। फिल्म का निर्देशन रवींद्र गौतम ने किया है और इसमें मुख्य भूमिका में अनंत जोशी ने योगी आदित्यनाथ का किरदार निभाया है। ​यह फिल्म शांतनु गुप्ता की किताब "द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर" से प्रेरित है। फिल्म अजय सिंह बिष्ट के साधारण लड़के से योगी आदित्यनाथ बनने की कहानी को पर्दे पर लाती है, जो उत्तराखंड के एक छोटे से गाँव से निकलकर भारत के सबसे बड़े राज्य के मुख्यमंत्री पद तक पहुँचते है। ...

नवरात्रि 2025

नवरात्रि 2025 ​ शारदीय नवरात्रि 2025 के लिए... "Navratri 9 colors, puja vidhi and fasting rules explained with simple tips to celebrate nine days of devotion and spiritual energy." नौ दिनों के ९ रंग: ​ पहला दिन (माँ शैलपुत्री): सफ़ेद ​यह रंग शांति, पवित्रता और सादगी का प्रतीक है। ​ दूसरा दिन (माँ ब्रह्मचारिणी): लाल ​यह रंग साहस, शक्ति, ऊर्जा और प्रेम को दर्शाता है। ​ तीसरा दिन (माँ चंद्रघंटा): रॉयल ब्लू (शाही नीला) ​यह रंग समृद्धि, शांति और स्थिरता का प्रतीक है। ​ चौथा दिन (माँ कूष्मांडा): पीला ​यह रंग खुशी, चमक और ज्ञान का प्रतीक है। ​ पांचवां दिन (माँ स्कंदमाता): हरा ​यह रंग प्रकृति, विकास और उर्वरता को दर्शाता है। ​ छठा दिन (माँ कात्यायनी): ग्रे (स्लेटी) ​यह रंग बुराई को नष्ट करने की शक्ति का प्रतीक है। ​ सातवां दिन (माँ कालरात्रि): नारंगी ​यह रंग ऊर्जा, उत्साह और सकारात्मकता का प्रतीक है। ​ आठवां दिन (माँ महागौरी): मोरपंखी हरा ​यह रंग विशिष्टता, नवीनता और समृद्धि का प्रतीक है। ​ नौवां दिन (माँ सिद्धिदात्री): गुलाबी ​यह रंग प्रे...

दादी माँ ने बताया एसिडिटी का आयुर्वेदिक इलाज

दादी माँ का इलाज Aayurvedik Home Remedies  एसिडिटी Acidity Treatment  हमारे शरीर में तीन दोष हैं वात, पित्त और कफ। इनमें संतुलन रहता है तो शरीर सामान्य स्थिति में रहता है। जब शरीर की जठराग्नि में विकृति आ जाती है तो गैस या एसिडिटी की समस्या पैदा होती है। आयुर्वेद में एसिडिटी की कई स्थितियां हैं। इन्हें समझ लें तो इनका उपचार भी काफी आसान है उध्र्वग अधोग स्थिति:  इसमें य्रूडम और अमाशय के बीच गैस बनती है। इस स्थिति में कफ का अनुबंध होता है, जिसमें मिचली आना, खट्टे डकार, छाती में जलन, भोजन में अरुचि आदि की समस्या महसूस होती है। यह उन लोगों को ज्यादा परेशान करती है, जो दूध से बनी चीजों, मीट-मछली आदि का ज्यादा सेवन करते हैं। ये वर्षा ऋतु है। इस मौसम में नई फसल से बना भोजन खाने से अम्ल की आशंका बढ़ जाती है। इस तरह के रोगी के गले में जलन होती है, वे बेचैन रहते हैं। इन्हें खट्टा डकार होता है। भोजन में अरुचि रहती है, उन्हें चकत्ते हो सकते हैं, बुखार भी हो सकता है। क्या करें: ऐसे लोगों को गिलोय के तने का दो चम्मच रस, आंवले का एक चम्मच रस, दोपहर में कागजी नींबू का शरबत, मिस्री के साथ...

दादी माँ ने बताया " एलर्जी " का आयुर्वेदिक इलाज

एलर्जी का आयुर्वेदिक इलाज ( Allergy ) "एलर्जी" एक आम शब्द, जिसका प्रयोग हम कभी 'किसी ख़ास व्यक्ति से मुझे एलर्जी है' के रूप में करते हैं. ऐसे ही हमारा शरीर भी ख़ास रसायन उद्दीपकों के प्रति अपनी असहज प्रतिक्रया को 'एलर्जी' के रूप में दर्शाता है। बारिश के बाद आयी धूप तो ऐसे रोगियों क़ी स्थिति को और भी दूभर कर देती है. ऐसे लोगों को अक्सर अपने चेहरे पर रूमाल लगाए देखा जा सकता है. क्या करें छींक के मारे बुरा हाल जो हो जाता है। हालांकि एलर्जी के कारणों को जानना कठिन होता है , परन्तु कुछ आयुर्वेदिक उपाय इसे दूर करने में कारगर हो सकते हैं. आप इन्हें अपनाएं और एलर्जी से निजात पाएं । • नीम चढी गिलोय के डंठल को छोटे टुकड़ों में काटकर इसका रस हरिद्रा खंड चूर्ण के साथ 1.5 से तीन ग्राम नियमित प्रयोग पुरानी से पुरानी एलर्जी में रामबाण औषधि है। • गुनगुने निम्बू पानी का प्रातःकाल नियमित प्रयोग शरीर सें विटामिन - सी की मात्रा की पूर्ति कर एलर्जी के कारण होने वाले नजला - जुखाम जैसे लक्षणों को दूर करता है। • अदरख , काली मिर्च , तुलसी के चार पत्ते , लौंग एवं मिश्री को मिलाकर बनाई ...

मराठी माणूस “मागे” का???

मराठी माणूस “मागे” का??? मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १) कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. २) अति राजकारण सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष. ३) दोनच हात कमावणारे सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. ४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे. ५)  खोटं बोल पण रेटून बोल सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे कर...

दादी माँ ने बताया "डायबिटीज" का आयुर्वेदिक इलाज

डायबिटीज का आयुर्वेदिक उपचार डायबिटीज अब उम्र, देश व परिस्थिति की सीमाओं को लांघ चुका है। इसके मरीजों का तेजी से बढ़ता आंकड़ा दुनियाभर में चिंता का विषय बन चुका है। जानते हैं कुछ देशी नुस्खे मधुमेह रोगियों के लिए - नीबू: मधुमेह के मरीज को प्यास अधिक लगती है। अतः बार-बार प्यास लगने की अवस्था में नीबू निचोड़कर पीने से प्यास की अधिकता शांत होती है। खीरा: मधुमेह के मरीजों को भूख से थोड़ा कम तथा हल्का भोजन लेने की सलाह दी जाती है। ऐसे में बार-बार भूख महसूस होती है। इस स्थिति में खीरा खाकर भूख मिटाना चाहिए। गाजर-पालक : इन रोगियों को गाजर-पालक का रस मिलाकर पीना चाहिए। इससे आंखों की कमजोरी दूर होती है। शलजम : मधुमेह के रोगी को तरोई, लौकी, परवल, पालक, पपीता आदि का प्रयोग ज्यादा करना चाहिए। शलजम के प्रयोग से भी रक्त में स्थित शर्करा की मात्रा कम होने लगती है। अतः शलजम की सब्जी, पराठे, सलाद आदि चीजें स्वाद बदल-बदलकर ले सकते हैं। जामुन : मधुमेह के उपचार में जामुन एक पारंपरिक औषधि है। जामुन को मधुमेह के रोगी का ही फल कहा जाए तो अतिश्योक्ति नहीं होगी, क्योंकि इसकी गुठली, छाल, रस और गूदा सभी मधुमेह में ...

“माणुसकी – मनाला स्पर्श करणारी कथा”

माणुसकी ➖➖➖➖➖➖➖➖➖ रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफरभाईंनी आपल्या पोराला, आसिफला, हाक दिली… “ओ आसिफ… चल गाडीयां अंदर लगा.” आसिफ मित्रासोबत गप्पा मारत होता. मित्राला _ “चल उद्या सकाळी कॉलेजात भेटू” _ म्हणत त्यानं कटवलं व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला. बारा बाय दहाच्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गिर्‍हाइकाच्या  गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही, हे त्यालाही ठाऊक होतं. त्यात बारीक पाऊस चालू झाला होता. गाड्या लावून होईपर्यंत जफरभाईंनी सगळं सामान आत ठेऊन दिलं. हात धुतले व पोराकडे पाहिलं… त्यांना बरं वाटलं. _ ‘आपण नशीबवान… पोरगं कॉलेज शिकतंय आणि धंद्यात पण आपल्याला मदत करतंय. नाहीतर आपल्या भावांची पोरं… सगळीजण गॅरेजच्या कामात… पण दहावीच्या पुढे एकपण शिकला नाही.’ _ पाऊस आता वाढला होता. अजून वाढण्याआधी घरी पोहोचणं आवश्यक होतं. दुकानाचं शटर ओढून कुलूप लावून जफरभाई वळणार, तोच एक तरुण जोडपं गाडी ढकलत त्यांच्या दरवाज्याशी आलं. बाइकवर आधीच जाऊन बसलेला आसिफ लगेचच म्हणाला, _ “दुकान बंद हुआ भाई…!” _ जफरभाईंनी आसिफकडे फक्त एक कटाक्ष...

विसर्जन

"विसर्जन'' ➖➖➖➖➖ पहाटेचे पाच वाजले तसें काशिनाथ रावांना जाग आली, ही त्यांची रोजचीच वेळ, आत उठून काय करायचे हा त्याच्या पुढे प्रश्न. बेडरूम मध्ये मुलगा प्रमोद आणि सून प्रणिता नातू आदर्श झोपलेले. काशिनाथराव आणि त्यांची पत्नी हॉलमध्ये, त्यांच्या पत्नीला गुढगे दुखी त्यामुळे ती वर कोचवर आणि खाली चटईवर काशिनाथराव. काशिनाथराव चुळबुळ करत पडून राहिले, त्याना माहित होत, यावेळी आपण उठलो तर सर्वांच्या तोफखण्याला तोंड द्यावे लागेल, त्यापेक्षा गुपचूप पडून राहावे. चहा चा वास आला की हळूच उठावे, कोणी चहा दिला तर गुपचूप घ्यावा. आपली परिस्थितीच तशी आली आहे किंवा घरातील इतरांनी आपली परिस्थिती घरातील झाडू सारखी केली आहे. काशिनाथ रावांनी निश्वास टाकला. पैसे न कमावणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती ही अशीच. काशिनाथरावांची पत्नी उठली आणि तिने चहा ठेवला हे त्यांनी ऐकले आणि ते हळूच उठले आणि बाथरूममध्ये गेले, चहा झाल्यावर ती मुलाला आणि सुनेला हाक मारायला त्याच्या बेडरूम जवळ गेली आणि दारावर थापा मारू लागली, हे त्यांनी ऐकले. त्याना वाटले ती आता आपल्याला चहा देईल, या आशेवर ते कोचवर बसून राहिले. तेप...