Skip to main content

Posts

Showing posts from November, 2025

सरप्राईज

सरप्राईज देण्यासाठी गेली पण... ➖➖➖➖➖ आज पहील्यांदा अचानक गावी जावून आईबाबांना आश्चर्यचकीत करणार होते. मला त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारा आनंद पाहायचा होता. तब्बल चार महीन्यानी मी गावी जात होते. 'माझ्या असानमेंट पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला गावी यायला नाही जमत आहे' असे अण्णांना सांगून मी मोबाईल बंद केला आणि मी माझी बॅग भरायला घेतली. हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत आमच्याच गावातील सरीता असल्यामुळे मला कधीच आई बाबांना आश्चर्यचकीत करता आले नव्हते. पण कालच सरीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. त्यामुळे हा प्लान मला आखता आला होता. माझ्या मोबाईलवर सरीताचा कॉल आला तेव्हा नाखुशीनेच मी तो उचलला. "हॅलो, बोल गं" "मी पोचले, तुझा काय प्लान आहे, शनिवार रविवारचा?" असे सरीताने विचारल्यावर मी सावध पवित्रा घेतला. "मी नानेघाटच्या ट्रेकला जातेय, नाईट स्टे आहे" मी ट्रेकला जाते म्हटल्याबरोबर तिने तिचे बोलणे आवरते घेतले. "ठीक आहे, बरं झालं मी मामाकडे निघून आले ते. मस्त आराम करायचा सोडून कसले ते डोंगर चढता कोणास ठाऊक?" असे बोलून तिने कॉल कट केला. पिच्छा सुटला...